मुंबई: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेवली असून मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या मतदारसंघाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत होत आहे. आजपर्यंत अनेक नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघात सभा घेत प्रचारात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांना मात्र मंतदारसंघाच जाता येत नाहीए. एकीकडे वडील शरद पवार यांचे आजारपण आणि दुसरीकडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पक्षासाठी प्रतिष्ठेची असलेली निवडणूक अशा दुहेरी पेचात सुळे सापडल्या आहेत. यावर उपाय काढत त्यांनी थेट ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून व्हर्च्युअल सभा घेत ही उणीव भरून काढली. ( address virtually from gate)

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवर कॅमेरा लावून आणि हातात माईक घेत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संबोधित केले. सुळे यांच्या या व्हर्च्युअल सभेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचा सामना भारतीय जनता पक्षाचे समाधान अवताडे यांच्याशी होत आहे.

भारत भालके आणि पंढरपूरसोबत आमचे एक वेगळेच नाते होते. भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदण्याचे ठरवले होते. मात्र नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असे वाटले नव्हते. आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपवण्यात आली आहे, असे सुप्रिया सुळे मतदारांना संबोधित करताना म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा-
सभेनंतर सुप्रिया सुळे यानी एक ट्विट केले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहिले. मला या प्रचारसभेसाठी प्रत्यक्ष यायचं होतं परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता या सभेला ऑनलाईन उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
भालके नानांची पंढरपूरच्या विकासाबाबत अनेक स्वप्ने होती. आता त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आपण पूर्ण करू, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणून देण्याचे आवाहन केले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here