लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत २५ ते १०० खाटांच्या रुग्णालयासाठी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
येत्या १५ दिवसांमध्ये मराठवाड्यातील घनसावंगी तालुक्यात हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान राबवले जाणार आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी प्राण सोडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ती मोठी उपलब्धी ठरणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच, हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर, तसेच ते कमी खर्चिक आहे. शिवाय हव्या त्या ठिकाणी घेऊन जात उपयोगात आणता येणारे असे हे तंत्रज्ञान आहे, असेही टोपे यांनी सांगितले आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत १ मे पर्यंत राज्य शासनाने निर्बंध लावले असल्याने या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न जाता घरातच राहून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times