मुंबई: राज्यातील वाढता करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली आणि आज रात्री ८ वाजल्यापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ”, अर्थात प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू झाल्यानंतर राज्यातील स्थिती काय आहे हे या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊ या…

Live अपडेट्स…

>>(क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)>> औरंगाबाद: क्रांंती चौकातील एक दृश्य…

>> कोल्हापूर: शहरातील रस्त्यावर असा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दसरा चौकातील हे दृश्य…

>>
अहमदनगर : शहरातील बारा ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद, गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांचा आदेश

>>
नाशिक : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध कठोर झाले असून, संचारबंदी लागू झाल्याने नाशिककरांना पोलिसांनी तंबी दिली आहे. रात्री आठ वाजेपासून शहरातल्या मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली असून, प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना गळ्यात ओळखपत्र अडकविण्याची सक्ती केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना आज इशारा दिला जात असून, उद्यापासून घराबाहेर दिसल्यास थेट कारवाई केली जात आहे.

>>
(क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)

>>
नाशिक : संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांकडून कसून चौकशी. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांची तंबी. उद्यापासून बाहेर दिसल्यास कारवाईचा इशारा

>>
पुणे- करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बुधवारी रात्रीपासून शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाहेरगावाहून येणारे नागरिक, माल वाहतूकदार तसेच गरजूंसाठी ओसवाल बंधू समाज संस्थेकडून दहा रुपयांमध्ये भोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्केटयार्डातील दि पूना मर्चंट्स चेंबरने या उपक्रमास सहाय्य केले आहे.

>> राज्यात ही संचारबंदी आणि करोना प्रतिबंधक नवे नियम पुढील १५ दिवसांसाठी असणार आहेत.

>> राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here