म. टा. प्रतिनिधी,
राज्य सरकारने गरजूंना स्वस्त धान्य दुकानांतून अन्नधान्य वितरण करण्याचे जाहीर केले असले, तरी ‘गरजू’ नक्की कोण? हे स्पष्ट केले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याची तयारी शहर आणि जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाने केली आहे. मात्र, ‘गरजूं‘मध्ये केशरी रेशनकार्डधारक आहेत की नाहीत, याबाबत स्पष्टता नसल्याने हा विभाग राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. (The in Pune is confused about who should be given )

राज्यात संचारबंदी लागू करताना, गरजूंना अन्नधान्य वितरण; तसेच शिवभोजन थाळी ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना (बीपीएल) अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. त्याची तयारी या विभागाने केली आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना ३५ किलो धान्य हे दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात येते.

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाउन करण्यात आल्यानंतर केशरी रेशन कार्डधारकांना एक मे २०२० पासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप करण्यात आले. या नागरिकांना आठ रुपये प्रति किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलोने तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत होते. मात्र, केशरी रेशनकार्डधारकांबाबत स्पष्ट आदेश नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

-पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे चार लाख ६० लाख असून, लाभार्थी संख्‍या सुमारे २० लाख

-पिंपरी चिंचवडमध्‍ये केशरी शिधापत्रिकांची संख्‍या दोन लाख ६५ हजार संख्या असून लाभार्थी सुमारे १० लाख

– जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या आठ हजार ६२५

– प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या १२ लाख २६ हजार १७५

– ७६० स्वस्त धान्य दुकानांद्वारे अन्नधान्यांचे वितरण

क्लिक करा आणि वाचा-

शिवभोजन थाळी कोणाला मोफत द्यायची?

शिवभोजन थाळी ही कोणाला मोफत द्यायची, याच्या निकषांबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्थेत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १४ ‘शिवभोजन थाळी केंद्र’ सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला दहा रुपयांमध्ये थाळी मिळत होती. त्यानंतर पाच रुपयांमध्ये थाळी देण्यात आली. गेल्या वेळी पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा, कौटुंबिक न्यायालय, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह, स्वारगेट एसटी स्थानक, गुलटेकडी मार्केट यार्डमधील समाधान गाळा क्रमांक ११, बुधवार पेठ येथील ग्रीन पॅलेस, हडपसर गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण आदी ठिकाणे होती. या थाळीचा लाभ ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात आला. या थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण देण्यात आले. आता ही थाळी मोफत देताना कोणते निकष असणार; तसेच जुनेच केंद्र सुरू करायची की नवीन ठिकाणे असणार, याबाबत राज्य सरकारने अद्याप स्पष्ट आदेश दिले नसल्याचे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here