व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी हा संवाद साधला. या बैठकीला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाकडून या बैठकीबाबत निवेदन जारी करून माहिती देण्यात आली. करोनावरील ही लढाई लसीकरणासोबतच जबाबदारी आणि मूल्यांचीही आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘राज्यपालांची भूमिका महत्त्वाची’
करोनाविरोधी लढाईत गेल्या वर्षी नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. यावेळी नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्य सरकार आणि समाजात उत्तम समन्वय साधण्यासाठी ते चांगले माध्यम बनू शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘आरटी-पीसीआर तपासणीवर भर’
सर्व समाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त शक्तीचा उपयोग करणं गरजेचं आहे. आपल्याकडे करोनाविरोधातील लढाईचा गेल्या वर्षाचा अनुभव आहे. तसंच चांगली आरोग्य व्यवस्थाही. आरटी-पीसीआर चाचणीवर भर देण्याची गरज आहे. आता पीपीई किट आणि इतर आवश्यक उपकरणांमध्ये देश आत्मनिर्भर आहे, असं मोदी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times