दिल्लीत करोनाच्या नवीन रुग्णसंख्येने रेकॉर्ड केला आहे. बुधवारसंपेपर्यंत १७, २८२ नवीन रुग्ण आढळून आले. ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्य आहे. दिल्लीत करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८८ टक्के आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण ६.६१ टक्के आहेत.
आयसीयू बेडची कमतरता
दिल्लीत व्हेंटिलेटरसह करोनाच्या आयसीयू बेडची सुविधा असलेले ९४ पैकी ६९ हॉस्पिटल्सचे सर्व बेड फुल झाले आहेत. फक्त ७९ बेड खाली आहेत. एका अधिकृत अॅपवरून ही माहिती घेतली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आढवा घेणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुरुवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. याशिवाय केजरीवाल हे मुख्य सचिव, आरोग्य मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय.
दरम्यान राजधानी दिल्लीत कल्याणपुरी भागात अनेक जणांना पोटदुखी, जुलाब उलट्या, मळमळ झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिंगाड्याचं पिठाचे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना हा त्रास झाला. या प्रकरणी कल्याणपुरी पोलिसांनी संबंधित दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times