वाचा:
भगीरथ भालके यांच्यासाठी अजित पवार यांनी पंढरपुरात प्रचाराची राळ उडवून दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणारा जन्माला यायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. त्यांच्या या टीकेला पाटील यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिलं आहे. ‘राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या घरी जाण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही. तो शरद पवारांचा स्वभाव आहे. असं असतानाही करोनाच्या संकटात अजित पवार दोनदा पंढरपुरात आले. अनेकांच्या घरी गेले. पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,’ असं पाटील म्हणाले.
वाचा:
‘अजितदादा अलीकडं जोरात आहेत. पण, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा हा प्रकार आहे. कारण, अजित पवारांवर सिंचनाच्या केसेस आहेत. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक बंद कारखाने त्यांच्या कुटुंबानं विकत घेतले आहेत. पवार कुटुंबाकडं किती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किती कारखाने आहेत याची श्वेतपत्रिकाच काढावी अशी परिस्थिती आहे. इतकं केल्यानंतरही ते उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर हे उपमुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उपमुख्यमंत्री आहेत. उद्या यदाकदाचित कम्युनिस्टांचं सरकार आलं तर तिथंही तेच उपमुख्यमंत्री असतील,’ असा चिमटा पाटील यांनी काढला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times