नागपूरः माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या पुढाकारातून नागपुरात आज १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले. केंद्रीय मंत्री यांनी आज सकाळी रुग्णालयाचे उद्घाटन केले. येत्या काही दिवसातच आणखी १०० खाटा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

‘नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनी सुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या ४-५ दिवसात स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. आज सकाळीच आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुध्दा आढावा घेतला. ५०० बेड आणखी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो आहे. काल केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे.आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे ही सुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा रेमडेसिवीरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे,’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

RT-PCR चाचणी सुविधा उपलब्ध

आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल लवकर येऊन विषाणूचा प्रसार थांबावा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने करीत असताना, आता एनसीआयमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची सुविधा वाढविण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन सुविधा सुध्दा कोविड रुग्णांसाठी नाममात्र दरात सुरुवात करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here