लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पतीने पत्नीवर दबाव टाकला. इतकेच नाही तर, तसे केले नाही तर घटस्फोट देण्याची धमकी त्याने दिली. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डालीगंजमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे २०१८मध्ये विधवा महिलेशी लग्न झाले होते. लग्नावेळी त्याने फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नात त्याने दुसऱ्याच कुणाला आपले आई-बाबा म्हणून दाखवले. पीडितेला याबाबत समजल्यानंतर तिने जाब विचारला. त्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. महिलेच्या तक्रारीनुसार, लग्नापूर्वी त्याने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अनेकदा आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गर्भपातही केला. लॉकडाउनच्या काळात व्यवसायात तोटा झाल्यावर आर्थिक चणचण भासू लागली. त्या काळात त्याने आपल्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली. नकार दिल्यानंतर मारहाण करत होता. तसेच घटस्फोट देण्याची धमकी देत होता, असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

महिलेने आरोपी पतीविरोधात लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. ‘प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला. मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाब टाकला, असे गंभीर आरोप महिलेने आपल्या पतीविरोधात केले आहेत. घटस्फोट देण्याची धमकीही देत असल्याचे तिने सांगितले. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू केला आहे, ‘ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here