महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. पण रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजनचे उत्पादन राज्यात होत नाहीए. महाराष्ट्राला इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवावा लागत आहे. मध्य प्रेदशात ऑक्सिजनच्या उत्पादनाची मोठी क्षमता नाहीए. गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये ऑक्सिजनचे उत्पादन होते. मात्र तिथेही रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकसह १० राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या राज्यांमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
करोनाची दुसरी लाट मोठी असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोग्यासाठी अर्थसंकल्पात दीडपट वाढ केली आहे. सरकारने आयुषमान योजनेवरही अर्थसंकल्पातून भर दिला आहे.
देशा करोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. आज ही संख्या २ लाखांवर गेली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत २,००,७३९ रुग्ण आढळून आले. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी ही माहिती दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times