औरंगाबाद: औरंगाबादमधील येथील एका शिवारातील विहिरीत २७ वर्षीय विवाहितेसह सात वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन्ही चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे तर मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. (वय २७), अरोही रविंद्र थोरात (वय ६ वर्षे) आणि आयुष रविंद्र थोरात (तीन वर्ष सर्व रा. गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. ( )

वाचा:

पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सुनीता शेखर देसरडा यांचे गेवराई तांडा येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागे शेत असून या शेतातील विहिरीत त्यांच्या कामगाराला तीन मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती त्याने चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढल्यावर मृत महिला ही गेवराई येथील रहिवासी असल्याचे परिसरातल्या लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मृत महिला वैशाली हिच्या सासरच्या लोकांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृत वैशाली हिच्या माहेरच्या लोकांची माहिती घेतली असता तिचे माहेर हे औरंगाबाद येथील क्रांतीनगरातील असल्याचे समोर आले. तिच्या माहेरच्या लोकांना या दुर्दैवी घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.

वाचा:

घटनास्थळी पोहचलेल्या माहेरच्या लोकांनी वैशाली व तिच्या मुलांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैशाली आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. माहेरच्या नातेवाईकांनी दोषी व्यक्तींना अटक करेपर्यंत आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या घटनेची चिकलठाणा पोलिसांनी नोंद केली असून आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

महिला व दोन मुलांच्या आत्महत्येचा प्रकार समोर येताच उपअधीक्षक , ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक अश्विनी कुंभार, सहायक फौजदार काशीनाथ लुटे, अंमलदार रविंद्र साळवे, संपत राठोड, पोलीस नाईक सुरासे घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. त्यानंतर तिघांच्या मृतदेहांची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, आत्महत्येमागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

मुलांना पाहून अनेकांनी व्यक्त केली हळहळ

विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते शेताच्या बाजूला ठेवण्यात आले होते. आई जवळ असलेली दोन्ही मुलं ही झोपेतच असल्यासारखी वाटत होती. यामुळे या दोन्ही मुलांना पाहून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here