मुंबई: संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांचे आभार मानले आहेत. ( )

वाचा:

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवले आहे. वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर यांनी उत्पादन सुरू करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले. कोविडच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही खूप मोठी बाब ठरली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here