पंढरपूर: भाजपचे सरकार येईल असं खोटं वारंवार बोलत असतात. तरीही आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत, असे सांगताना भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी भाजपला दिला आहे. ( Latest News )

वाचा:

मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपुरात आहेत. येथे बोलताना पाटील यांनी आज पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणू असे सांगितले आहे पण हे पैसे कुणी मागितले?, असा तीरकस सवाल पाटील यांनी केला. योजना पूर्ण करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे, असेही ते म्हणाले. पंढरपूर – मंगळवेढ्याच्या जनतेची इतकी काळजी होती तर मागच्या ५ वर्षांत कामे का नाही केली? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी केला. पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले असा थेट आरोपही पाटील यांनी केला.

वाचा:

पंढरपूर – मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारतनानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारतनानांना निवडून दिले. आजही तीच परिस्थिती आहे. काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मधल्या काळात बरेचजण आम्हाला सोडून गेले पण भारतनानांनी विरोधी विचारांची कास धरली नाही. आमच्या पडत्या काळात आम्हाला साथ दिली. अडचणीच्या काळात जे साथ देतात त्यांना आपण कधीच विसरत नसतो, आम्हीही भारतनाना आणि त्यांच्या कुटुंबाला सदैव साथ देणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भारतनानांचा लोकांशी दांडगा संपर्क होता. ते सतत लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उपलब्ध असायचे. लोकांच्या अडीअडचणींमध्ये धावून जायचे. आपल्याला ही परंपरा कायम ठेवायची आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीने आपल्याला भगीरथ यांच्या रुपाने तरुण उमेदवार दिला आहे. नानांच्या भगीरथाला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here