मुंबई : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला बीसीसीआयने आज एक मोठा धक्का दिला आहे. विजय हझारे ट्रॉफीमध्ये पृथ्वीने आठ सामन्यांमध्ये ८००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघात स्थान दिले नव्हते. पण आता तर बीसीसीआयने पृथ्वीला अजून एक धक्का दिला आहे. त्यामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होणार आहे.

बीसीसीआयने आज आपले खेळाडूंबरोबरचे वार्षिक करार जाहीर केले. यावेळी पृथ्वीला या करारामध्येच सामील करण्यात आलेले नाही. त्यामुळे पृथ्वीसाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण आता पृथ्वीला करारामध्ये यायचे असेल तर त्याला आता बराच काळ वाट पाहावी लागेल. त्याचबरोबर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे कधी उघडले जातील, याबाबतही आता प्रश्नचिन्ह आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक करारात कोणाले मिळाले स्थान, पाहा…बीसीसीआयच्या करारामध्ये चार विभाग केलेले असतात. यामध्ये सर्वप्रथम A+ हा विभाग येतो, यामधील खेळाडूंना दरवर्षी सात कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतात. या गटामध्ये तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना संधी देण्यात आली आहे. या तिघांनाही बीसीसीआयकडून सात कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआय A गटातील खेळाडूंना वार्षिक पाच कोटी रुपये देते. या गटामध्ये बीसीसीआयने रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांना संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या करारामधून B गटातील खेळाडूंना दरवर्षी तीन कोटी रुपये मिळतात. या गटामध्ये बीसीसीआयने भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, वृद्धिमान साहा, मयांक अगरवाल आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयकडून C गटातील खेळाडूंना दरवर्षी एक कोटी रुपये देण्यात येतात. बीसीसीआयने गटातील खेळाडूंमध्ये कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिला, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय दरवर्षी आपल्या खेळाडूंबरोबर करार करत असते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here