नवी दिल्लीः सीडीएस जनरल ( ) यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दात संदेश दिला. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कुठल्याही दबावापुढे झुकणार नाही, असं रावत ( ) म्हणाले. पूर्व लडाखमधील तणावाचा उल्लेख त्यांनी केला. भारत उत्तर सीमेवर जैसे स्थिती बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना रोखण्यासाठी भक्कमपणे उभा राहील. एवढचं नाही तर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठल्याही दबावापुढे झुकणार नाही हे भारताने सिद्ध केला आहे, असं रावत यांनी सांगितलं.

भारत आपल्या उत्तरेतील सीमांवर भक्कमपणे उभा आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारत झुकणार नाही. सीमा भागातील जैसे थे स्थिती बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना रोखण्यासाठी भारत भक्कमपणे उभा असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे समर्थन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, असं सीडीएस बिपीन रावत म्हणाले.

कुठल्याही बळाचा वापर न करता अत्याधुनिक हत्यारांचा उपयोग करून सीमेवरी जैसे थे स्थिती बदलवण्याचा प्रयत्न चीन करत आहे. भारत आपल्या दबावापुढे झुकेल या विचारत चीन आहे. पण आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी भारत भक्कमपणे उभा आहे आणि कुणासमोर झुकणार नाही, हे सिद्ध केलं आहे, असं रावत यांनी स्पष्ट केलं.

भारत-चीन सीमेवर वादग्रस्त भागात गेल्या वर्षी चिनी सैनिकांनी केलेली घुसखोरी गंभीर होती, असं अमेरिकेने अलिकडेच म्हटलं आहे. सीमेवर संघर्ष टाळण्यासाठी काही ठिकाणांवरून भारत-चीनचे सैनिक मागे हटवण्यात आले असली तरी तणावाची स्थिती मात्र अद्यापही कायम आहे. अनेक दशकांनंतर दोन्ही उभय देशांमध्ये अशा प्रकारची स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, असं अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here