दोन पोलिसांच्या हत्येच्या घटनेवर गावकरी काहीही बोलण्यास तयार नाहीत. तर या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी दिली. पुनेम हडमा आणि धनीराम कश्यप अशी हत्या झालेल्या पोलिसांची नावं आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांवर २३ दिवसांतील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
नक्षलवाद्यांच्या एका छोट्या टीमवर संशय
दोन पोलिसांच्या या हत्येमागे नक्षलवाद्यांच्या छोट्या टीमचा हाथ असू शकतो, अशी माहिती ग्रामीण भागातील सूत्रांनी दिली. नक्षलवाद्यांच्या अशा टीम कॅम्प बाहेर जाणाऱ्या पोलिसांवर लक्ष ठेवून असतात. गावकऱ्यांमध्ये रहात असलेल्या नक्षलवाद्यांना ओळखणं कठीण होतं. अशावेळी ते संधी साधून पोलिसांवर हल्ला करतात. ही घटना जिथे झाली तिथे पोलिस कायम दारू पिण्यासाठी दवाखान्यात आणि बाजाराशी संबंधित कामांसाठी जात असतात.
पोलिसांची हत्या झाल्याची माहिती कळताच सुकमा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात दोन्ही पोलिसांचा मोठा रक्तस्त्राव झाल्याने पोलिसांची टीम येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत नक्षलवादी सामील असल्याची कुठलीही माहिती नाहीए, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
यापूर्वी ३ एप्रिलला बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २३ जवान शहीद झाले. तसंच त्यांनी सीआरपीएफच्या एका कमांडोचं अपहरणही केलं होतं. पण नंतर त्या जवानाला सोडून दिलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times