म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढला असला तरी दुसरीकडे बाधित गावांमधून सक्रिय रुग्णांची संख्या आता शून्यावर आली आहे. जिल्ह्यातील १४०४ ग्रामपंचायतीपैकी ४४४ गावांमधून हद्दपार झाल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात एक हजार ४०४ ग्रामपंचायतींपैकी ४४४ गावे झाले असून, याचे प्रमाण ३१.६२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक हवेली तालुक्यातील गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील दैनंदिन करोनामुक्तांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांमध्ये वाढत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

वाचा:

प्रशासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील ‘हॉटस्पॉट’ असलेल्या गावांमधील करोना नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षात गावपातळीवर नागरिक करोनाविषयी किती गंभीरपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत, हे पाहून आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वाचा:

भोर तालुक्यातील सर्वाधिक १०१ गावांतून करोना हद्दपार झाला आहे. शिरूर तालुक्यातील सर्वाधिक कमी १० गावांमधील करोनारुग्णांची संख्या शून्य झाली आहे. दरम्यान, करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील सुमारे २२९ गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here