जयंत सोनोने ।

राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाला आळा घालण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती पॅटर्नचा वापर करून राज्यात करोनाला अटकाव घालण्याचा विचार सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यात गुरुवारी ५३४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मेंदूज्वरावर उपचार घेत असलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

वाचा:

अमरावती जिल्ह्यात करोनामुळं मृत झालेल्यांची संख्या ७४९ वर जाऊन पोहोचली असून, करोनाबाधितांचा एकूण आकडा ५४ हजार ४९७ झाला आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या करोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या धारणी, चिखलदरा सारख्या ग्रामीण भागात करोनाचा प्रकोप सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील नोंदीनुसार, गुरुवारी मृत झालेल्यांमध्ये दापोरी, राजुरा बाजार, दसरा मैदान, अमरावती, वरुड, तिवसा, सावलीखेडा, चांदुर रेल्वे, जलाराम नगर, अमरावती शहर, वालेगाव, मध्य प्रदेश, गुरुकुल कॉलनी, परतवाडा, कारला येथील रुग्णांचा समावेश आहे. यात ८५ वर्षांपर्यंतचे रुग्ण असून काही महिलांचाही समावेश आहे.

वाचा:

सध्या जिल्हाभरात ३ हजार ५८८ व्यक्ती करोनाने बाधित असून त्यांच्यावर विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ५३४ जणांनी या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ५० हजार १६० वर पोहोचली आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुध्दा करोना झपाट्याने पसरत असल्याने चिंतेत वाढत झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here