‘महाराष्ट्र सरकार करोनावर उपाययोजना करायला व रुग्णांना आवश्यक औषधं द्यायला, करोना परिस्थीती हातळण्यात कमी पडलं आहे. म्हणून आज राज्यात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढली आहे. जवळपास महाराष्ट्रात एकूण ५९ हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचं, व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आहे,’ असं स्पष्ट मत राणेंनी व्यक्त केलं आहे.
वाचाः
‘एकूणच देशात जे रुग्ण मृत्यू पावले त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजेच ४१ टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री वारंवार लॉकडाऊनची धमकी देत होते. जसं काय महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतलंय, तसं दम द्यायचं काम मुख्यमंत्री करत होते. शेवटी त्यांनी लॉकडाऊन लागू केला. रिक्षावाल्यांना १५०० देणार. पण ५ माणसांचं कुटुंब १५०० रुपयांमध्ये उपजीविका करु शकणार आहे का?,’ अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
वाचाः
‘प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करतात?, असा टोला त्यांनी हाणला आहे. तसंच, राज्य आर्थिक संकटात दाखवण्याचं काम आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाहीये,’ असंही राणेंनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times