महेश गुंडेटीवार । सध्या गडचिरोली जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागात लग्न समारंभांमध्ये गर्दी करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र कायम राहिल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. लग्नसमारंभासाठी निश्चित संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास वधुवरांच्या कुटुंबीयांबरोबरच संबंधित गावचे व ग्रामसेवकांवरही कारवाई होणार आहे.

वाचा:

ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्याने नव्या करोना निर्बंधांनुसार, लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आईवडील, मंगल कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. तसेच संबंधित गावाचे तलाठी व यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

वाचा:

एप्रिल मधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला विविध ग्रामीण कार्यक्रमातील गर्दी कमी करणेबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

वाचा:

जिल्हा माहिती कार्यालयातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात आज ११ जणांचा मृत्यू झाला तर, ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, १८३ जणांनी करोनवर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित १४०१९ पैकी करोनामुक्त रुग्णांची संख्या ११,२४९ वर पोहोचली आहे. सध्या २५८५ सक्रिय करोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील करोनाबधितांची तालुका निहाय संख्या

नव्या ४३४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६५, अहेरी तालुक्यातील ६८, आरमोरी ३३, भामरागड तालुक्यातील १४, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २१, एटापल्ली तालुक्यातील १७, कोरची तालुक्यातील १२, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १७, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ४, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ९ तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ४२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या १८३ रुग्णांमध्ये गडचिरोली मधील ७५, अहेरी १४, आरमोरी १४, भामरागड ११, चामोर्शी ८, धानोरा ९, एटापल्ली ७, मुलचेरा ३, सिरोंचा ५, कोरची ४, कुरखेडा ६, तसेच वडसा २७ जणांचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here