अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी लसीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा थांबवला आहे. यासंदर्भात अदर पुनावाला यांनी एक ट्वीट करत जो बायडन यांना विनंती केली आहे.
‘आदरणीय जो बायडेन, जर आपण खरंच करोनावर मात करण्याच्या लढाईत एकत्र आहोत. तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो, की अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळं लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे,’ असं अदर पुनावाल यांनी म्हटलं आहे.
अमेरिका आणि युरोपमधून करोनाची लस निर्मिती करण्यासाठी जो कच्चा माल येतो त्याचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. यामुळं कच्चा माल मिळवण्यासाठी सीरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी अदर पुनावाला यांनी कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती दिली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times