बीडः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मंडे आणि भाजप नेत्या यांच्यात ट्विटर युद्ध सुरु झाल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर यांनी दिलेल्या उत्तरांवर पंकजा यांनी पुन्हा पलटवार केला आहे.

पंकजा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यातील करोना परिस्थितीकडं लक्ष देण्याची विनंती केली होती. तसंच, धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. पंकजा यांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या ट्वीटवर उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, असं धनंजय मुंडे यांनी लिहलं होतं. त्यानंतर हाच धागा पकडत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

‘राज्याच्या भल्यासाठी पंतप्रधान, जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना ही पत्र लिहिन दखल ही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास, निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा. उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ,’ असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

बीडमधील सत्ताधारी फक्त माफियांचं हित साधण्यात गुंतल्यामुळं जिल्ह्यात करोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. तसं पत्र त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहलं होतं. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या ट्वीटला उत्तर देताना जिल्ह्यातील लस उपलब्धतेची नेमकी माहिती दिली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here