मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयातून यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांनी केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं विजयाचा झेंडा रोवल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील सत्ता कायम राखण्यात ”ला यश आलं आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार, दिल्लीत ‘आप’ला ६२ जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे, तर भाजपला अवघ्या आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. निवडणूक निकालांच्या कलानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयातून केजरीवाल यांनी देशाला ‘जन की बात’ दाखवून दिली आहे. आपण म्हणजे देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे, असं ठाकरे म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील नागरिकांचे अभिनंदन करतो. दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे, तर आता देशात ‘जन की बात’ चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार केंद्रात असून, सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा ‘झाडू’समोर निभाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी-महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करून, स्थानिक प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करूनही केजरीवाल यांना ते पराभूत करू शकले नाहीत. दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवरील विश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं, असं ठाकरे म्हणाले. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असंही ठाकरे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here