वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याच निर्धाराने महाराष्ट्रात करोना नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पावले टाकणारे आणि कोविड नियंत्रणासाठी वेळोवेळी योग्य निर्णय घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. मात्र, ज्यांना सरकारच्या द्वेषाची कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसतं आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत. त्यांना खुर्ची मिळत नाही म्हणून ते वेडेपिसे झाले आहेत. हा माणूस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बरळत सुटला आहे. त्यांना जितकं बरळायचं असेल तितकं बरळू दे. त्याने काहीही फरक पडणार नाही, असेही राऊत यांनी सुनावले.
वाचा:
नारायण राणे यांचे राजकीय आयुष्यच मेवा लुबाडण्यात गेले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी आता अनिल परब असतील किंवा महाविकास आघाडी सरकार असेल त्यावर टीका करण्याचे धारिष्ठ्य करू नये, असा इशाराही राऊत यांनी दिला. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरे व अनिल परब यांच्यावर टीका केली होती. त्याला राऊत यांनी येथे माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. यावेळी राणे यांना एकप्रकारे इशाराच राऊत यांनी दिला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times