मेळघाटातील आदिवासी घरातील शुभकार्यापासून ते सर्दी, खोकला, तापासह इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी भुमकाकडे (मांत्रिक) जातात. सेमाडोह येथील एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह असताना सुध्दा आरोग्य यंत्रणेपासून हे लपवून ठेवले. दरम्यान सदर महिलेनं पारंपारीक औषधोपचार घेण्यासाठी भुमकाकडे जाण्याचे ठरवले. यासाठी तीने सेमाडोह पासून दहा किमी अंतरावरील भवई येथील भुमकाकडे जावून औषधोचार घेण्यास सुरुवात केली. मात्र गुरुवारी तिची प्रकृती खालावल्यानं मुत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ उडाली आहे.
वाचाः
सदर करोना पॉझिटिव्ह महिलेवर गुरुवारी रात्री अत्यंसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. मात्र नातेवाईकांनी नकार दिल्याची माहिती तहसिलदार माया माने यांनी दिली आहे. अखेर नातेवाईकांच्या विरोधानंतर शुक्रवारी २ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल २० तासानंतर अत्यंसंस्कार करण्यात आल्याने सेमाडोह येथील रुग्ण वाढत्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाचाः
जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना ग्रामीण भागात सुध्दा करोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. नागपुर शहरातील करोना रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु असतांना आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. दरम्यान मेळघाट सारख्या दुर्गम व निसर्गसंपन्न भागात सुध्दा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भुमकाकडे (मांत्रिक) जावून उपचार घेणाऱ्या सेमाडोह येथील महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ उडाली असून करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच औषधोपचार घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times