काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष यांनी केंद्र सरकारला पत्र लिहत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिनसारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तर, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री यांनी हाफकिन संस्थेला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली होती. व हाफकिनला लस निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. अलीकडेच तशी परवानगी हाफकिनला देण्यात आली आहे. मात्र, आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटवरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
संदीप देशपांडेचं ट्वीट
संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या पत्रामुळं हाफकिनला परवानगी देण्यात आली, असा दावा केला आहे. ‘राज्य सरकारने जानेवारी महिन्यातच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’. करोना काळात राजकारण नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
किशोरी पेडणेकर यांचं उत्तर
संदीप देशपांडे यांच्या ट्वीटनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत पत्रव्यवहार करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रव्यवहार केला आणि या सगळं महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी चांगलं झालं आहे. पण राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असं म्हणणं बालिश होईल. पंतप्रधानांचा कामाचा व्याप पाहाता राज्याचा प्रस्ताव गेला तेव्हा ते कदाचित शक्य झालं नसेल. पण राज्याच्या काळजीपोटी सगळ्यांनीच प्रयत्न केले. त्याचा एकत्रित परिणाम दिसला. यात श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times