सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक आहे.
या पोटनिवडणुकीत १९ उमेदवार आपले नशीब आजमावत असले, तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे यांच्यातच आहे.
– भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
– पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४२ टक्के मतदान
– मतदानासाठी नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे
– पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे
– आज पंढरपूर मतदारसंघातील तीन लाख ४० हजार ८८९ मतदार मतदान करतील
– पंढरपूर मतदारसंघातील ५२४ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत मतदान होईल
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times