मुंबईः राज्यातील करोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असतानाच ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढत आहे. उपलब्धतेपेक्षा मागणी अधिक असल्यानं राज्यात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली असून त्याची झळ रुग्णांना बसत आहे. मुंबई उपनगरातील भगवती रुग्णालयात रुग्णांना अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळं रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागल्याची घटना घडली आहे.

करोना संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं ऑक्सिजनच्या तुटवड्याची झळ आता खासगी रुग्णालयांप्रमाणे पालिका रुग्णालयांनाही बसू लागली आहे. बोरीवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळं या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालय व कोव्हड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. दुर्दैवानं पालिका रुग्णालयातच ऑक्सिजनचा तुटावडा निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी दिली आहे.

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर भाजपचे नेते यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळं गोवंडी येथील शताब्दी, वांद्रे येथील भाभा, कुर्लातील भाभा रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन अभावी दुसऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यातील त्रुटीमुळं महाराष्ट्रात अनेक कोविड रुग्णांना जीव गमवावे लागतात, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here