वाचा-
या सामन्यात चेन्नईचा जलद गोलंदाज ()ने धमाकेदार कामगिरी केली. त्याने ४ षटकात १३ धावा देत चार विकेट घेतल्या. चेन्नईच्या विजयात दीपकची मोठा वाटा होता. त्याच्या घात गोलंदाजीमुळे पंजाबची दाणादाण उडाली होती. दीपकच्या घातक गोलंदाजीमुळे पंजाब किंग्जची अवस्था ५ बाद २६ अशी झाली होती.
दीपकने या सामन्यात स्विंग गोलंदाजीचा एक उत्तम नमूना सादर केला. त्याची गोलंदाजी पाहून दिग्गजांना देखील धक्का बसला. दिपकच्या या कामगिरीमुळेच त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत असेल तरी दीपकने सामना सुरू होण्याआधीच सर्वांचे मन जिंकले.
वाचा-
सामना सुरू होण्याआधी जेव्हा दोन्ही संघ सराव करत होते, तेव्हा दीपक आणि यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत दीपक त्याचा सिनिअर गोलंदाज शमीला पाया पडताना दिसत आहे.
हा फोटो आयपीएलने त्यांच्या अधिकृत खात्यावरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया येत आहे. शमीच्या आशिर्वादामुळेच दीपकला चांगली गोलंदाजी करता आली असे काही चाहत्यांनी म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times