या निवडणुकीत सर्वपक्षीय १९ उमेदवार रिंगणात असले तरी तुल्यबळ लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे अशीच झाली. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक लागली होती. राज्यात अन्यत्र कुठेच निवडणूका नसल्याने विधानसभेची ही पोटनिवडणूक महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांनी आणि राज्यात विरोधक असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची केली होती. याचे कारण म्हणजे, राज्यात बेरजेचे राजकारण करत अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतरची ही पहिलीच निवडणूक होती.
क्लिक करा आणि वाचा-
ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्र्यापासून प्रवक्ते अमोल मेटकरी यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी गाजवली. त्यांच्या प्रत्त्युरादाखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाळा भेगडे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गाजवली.
क्लिक करा आणि वाचा-
राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या सहानुभूतीचा विचार करुन राष्ट्रवादीने त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांना मैदानात उतरविले होते, तर त्यांच्या विरोधात भाजपने मंगळावेढ्याचे उद्योजक आणि दोन निवडणुकांचा अनुभव असलेले समाधान आवताडे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले होते. स्थानिक पातळीवर साखर पट्ट्यातील ही निवडणूक आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्यासाठी तर कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी गावपातळीवर यंत्रणेची धुरा सांभाळली.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात चर्चेत राहिलेल्या या उत्साही मतदानाचा कौल कुणाला मिळणार हे येत्या २ मे रोजी लागणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times