ा नागपूर: या कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुपट्टीने परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ग्राहकांची ४८ लाख ६० हजार रुपयांनी करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी दाम्पत्यासह आठ जणांविरुद्ध दाखल केला आहे. (police have registered a case against eight persons for of rs 48 lakh 60 thousand in nagpur)

निषेध महादेव वासनिक, प्रगती निषेध वासनिक (दोन्ही रा. गोंडगाव, पारशिवनी, जि. नागपूर), गजानन भोलेनाथ मुंगने (रा. नंदनवन), संदेश पंजाब लांजेवार (रा. गोंडगाव, पारशिवनी), श्रीकांत लक्ष्मणराव वाड, राजेंद्र रायभान खोब्रागडे, साक्षी राजेंद्र खोब्रागडे, अभय श्रीनिवास वाघधरे (रा. वंजारीनगर),अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
ऑगस्ट २०२० मध्ये या आठ जणांनी ईथर ट्रेड एशिया नावाची बनावट कंपनी स्थापन केली. त्यांनी आपल्या या बनावट कंपनीची वेबसाइटही तयार केली. त्यानंतर त्यांनी आपल्या या बनावट कंपनीची जाहिरात देऊन दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले. ही आकर्षक जाहीरात पाहून नीलेश नरहरी मोहाडीकर (वय ३३, रा. पंचवटीनगर, बिनाकी ले-आउट) याने व अन्य गुंतवणुकदाराने कंपनीत गुंतवणूक केली. मात्र त्याला लाभ मिळाला नाही. इतकेच नाही कर मोडीकर याला त्याने गुंतवलेली त्याची मूळ रक्कम देखील परत मिळाली नाही.

क्लिक करा आणि वाचा-
आपली फसवणूक झाली हे समजल्यानंतर गुंतवणूकदार नीलेश मोहाडीकर याच्यासह इतर काही ग्राहकांनी यशोधरानगर पोलिसांत या फरवणुकीविरुद्ध तक्रार दिली. ग्राहकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here