म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये करोनाच्या उपाचारासाठी दाखल झालेली तांदलवाडी येथील महिला आज पहाटे अचानक गायब झाली. अखेर पोलिस प्रशासनाच्या मदतीने आरोग्य यंत्रणेनेने शोध घेत या महिलेस रेल्वेस्थानक रोड परीसरातील केळीच्या बागेतून ताब्यात घेवून सेंटरवर आणले. (the old woman who disappeared from the was finally found in a )

रावेर येथिल ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन कोविड सेंटरमध्ये रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील करोना बाधित ६५ वर्षीय वृ्ध्दा उपचारासाठी दाखल झाली होती. आज शनिवारी पहाटे पाच वाजता ही महिला कुणालाही न सांगता अचानक सेंटरवरून निघून गेली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना याची विचारणा केली. मात्र याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे महिलेचे कुटुंबिय व आरोग्य यंत्रणेमध्ये शाब्दिक चकमक घडली.

पोलिसांच्या मदतीने घेतला शोध

घटनेची वार्ता पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्यापर्यंत पोहचल्यानतंर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोलीस नाईक सुनील वंजारी, गोपाळ पाटील यांचे पथक शोधार्थ रवाना केला. शहराच्या चारही दिशेला शोध घेतल्यानतंर ही महिला रेल्वे स्थानक रोडवर परिसरातील जुना पुनखेडा रोडवरील बौद्ध नगरीच्या पुढील बाजूस जुन्या स्मशानभूमीजवळ केळीच्या बागेत एका झाडाखाली बसलेली आढळून आली. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा ऑक्सीजन सेंटरवर आणल्यानतंर तीच्या नातेवाईकांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी

येथील ग्रामीण रुग्णालयाचे आवार प्रशस्त आणि बंदिस्त आहे पण येथील फाटक रात्रीही उघडेच असते. प्रशासनाने रात्री ते बंद करावे तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here