नागपूर: जीवाच्या भीतीने कोव्हिड सेंटरमधून पळालेल्या झाला. ही धक्कादायक घटना उमरेड येथे शनिवारी उघडकीस आली. या घटनेने उमरेडमध्ये खळबळ उडाली आहे. राजेश नान्हे (वय ३५),असे मृतकाचे नाव आहे. त्याचा वाहन भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ( who escaped from the )

काही दिवसांपूर्वी राजेश याची प्रकृती खालावली. तपासणी केली असता तो करोनाबाधित असल्याचे आढळले. १४ एप्रिलला त्याला उमरेडमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री सेंटरमधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश हा घाबरला.जीवाच्या भीतीने शुक्रवारी रात्री ऑक्सिजन काढून त्याने सेंटरमधून पलायन केले. मधरात्री राजेश बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. शनिवारी सकाळी इतवारी प्राथमिक शाळेजवळ राजेश याचा मृतदेह आढळून आला.शोकाकूल वातावरणात कोव्हिड नियमानुसार राजेश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनने समाजमन सुन्न झाले आहे. राजेश याच्या ममागे पत्नी, दोन मुली आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

नागपूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान, नागपुरात कडक निर्बंधांची अमंलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहेत. या अंतर्गत मेयो हॉस्पिटल समोर नागपूर पोलिसांची यू टर्न कारवाई केली. या बरोबरच अनावश्यक बाहेर निघालेल्या लोकांवर नागपूर पोलिसांतर्फे चौका चौकात रॅपिड अँटिजेन टेस्ट (rapid antigen test) करण्यात आली. या तपासणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना आयसोलेशन केंद्रात पाठविण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

रेमडेसिवीरच्या काळाबाजारात तिघांना अटक

या बरोबरच रेमडेसिव्हिरच्या काळाबाजारात एका क्राइम रिपोर्टरचाही सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली आहे. जरीपटका पोलिसांनी शनिवारी मार्टिननगरमध्ये कारवाई करून क्राइम रिपोर्टरसह तिघांना अटक केली.

क्लिक करा आणि वाचा-
नागपूरच्या मार्टिननगर भागात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here