म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांच्याशी संपर्क साधला असून, महाराष्ट्राला तातडीने १२०० ते १५०० टन ऑक्सिजनची आवश्यकता असल्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला गरजेनुसार ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करण्यास सांगितले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मुख्यमंत्री तीन वेळा पंतप्रधानांशी बोलल्याचेही सूत्रांकडून समजते.

राज्यात भासत असल्याने स्थिती अधिक गंभीर बनल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक सविस्तर पत्र दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. राज्यातील कोव्हिडची सध्याची स्थिती व आकडेवारी त्यात नमूद करतानाच सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय कारणांसाठीच्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याकडे लक्ष वेधले होते. राज्यात कोव्हिड चाचण्या वाढवल्या आहेत. त्यात नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या ११.९ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, राज्यात आता दरदिवशी १२०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिलअखेरपर्यंत ऑक्सिजनची ही मागणी दिवसाला दोन हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

‘हवाईमार्गे वाहतूक व्हावी’

देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने आम्हाला मान्यता दिली आहे. मात्र, वेळेत ऑक्सिजन मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे होण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. या पत्रानंतर ऑक्सिजनची तातडी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता पंतप्रधानांना थेट फोन केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला नियमितपणे गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यास त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावू नये, असेही मतही पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे कळते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here