जैवविविधता व नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणाऱ्या मेळघाटात कोरकू बिल्ल गोंड व गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हातमजुरी शेती व शेतीपूरक व्यवसायातून येथील आदिवासी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीसोबतच मेळघाटातील आदिवासी शेतकरी दररोज हजारो लिटर दूध जिल्ह्यात पाठवतात. मात्र निसर्गाशी नाळ जोडलेला आदिवासी शेतकरी गुराढोरांना प्रति कृतज्ञता व्यक्त करत रविवारी एक थेंब सुद्धा दुधाची विक्री न करता कोरे दूध किंवा ताक तयार करून जनावरांना पाजतात.
वाचा:
मेळघाटातील गवळी कोरकू व इतर आदिवासी समाजातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. एका शेतकऱ्याकडे किमान ३० ते ३५ गायी व म्हशी असतातच. मेळघाटातील अनेक भागात वनविभागाने चराई प्रतिबंध केल्याने या गुराख्यांना वर्षभर चाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागते. मेळघाटातील शेतकरी प्रामुख्याने अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव पथरोड, आसेगाव, चांदूर बाजार, वलगाव, मोर्शी भागात जाऊन दुग्ध व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
वाचा:
रविवारी दूध विक्री न करण्याची परंपरा ही पिढ्यानपिढ्या सुरू असल्याची माहिती हे गुराखी बांधव देतात. महागाई शिखर गाठत असतानासुद्धा आपल्या गुराढोरांना प्रति कृतज्ञता व्यक्त करत रविवारी दुधाची विक्री परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. या परंपरेला धार्मिक किनार असली तरीसुद्धा त्यामागचा मुख्य उद्देश हा गुराढोरांना प्रती असलेला कृतज्ञताभाव आहे. महागाईचे चटके सोसत असताना सुद्धा नफा-तोटा असा विचार न करता आपली परंपरा जपत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times