बीजिंग: चीन आणि भारतादरम्यान लडाख पूर्वमधील सीमा तणावाला जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी अजून वाद सुरूच आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या ११ फेऱ्या पार पडल्या आहेत. तरीदेखील अद्याप तोडगा निघाला नाही. चीनची मग्रुरी कायम असल्याचे नुकत्याच झालेल्या चर्चेतून समोर आले. चीनने लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातून सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर भारताला जेवढं ळाले आहे, त्यात समाधानी रहावे अशी मल्लिनाथीही चीनने केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ९ एप्रिल रोजी झालेल्या कमांडर स्तरावरील चर्चेत चीनने हॉट स्प्रिंग, डेपसांग मैदान आणि गोगरा पोस्टमधून माघार घेण्यास नकार दिला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यांनी पँगोंग सरोवर आणि कैलास रेंजमधून माघार घेतली होती. त्याशिवाय इतर वादग्रस्त ठिकाणांबाबतही चर्चा करण्यास सहमती झाली होती.

वाचा:
उच्चपदस्थ भारतीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने पहिल्यांदा हॉट स्प्रिंगच्या पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पीपी-१७ ए आणि गोगरा पोस्टवरून माघार घेण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. भारताला जेवढं मिळाले आहे, त्यात त्याने समाधानी असले पाहिजे असे चीनने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पीपी-१७ए चिनी सैन्याने पलटण स्तरारवरील सैन्य तैनात केले आहेत. भारतीय सैन्याच्या एका पलटणीत ३० ते ३२ जवान असतात. तर, लष्कराच्या एका कंपनीत १०० ते १२० जवान असतात.

वाचा:
सुत्रांनी सांगितले की, या भागात ये-जा करण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता नाही. चिनी सैन्य वेगाने जलदपणे ये-जा करते. त्याशिवाय त्यांनी भारतीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे. मागील दोन ते तीन वर्षात भारत अद्यापही पँगोंग सरोवर फिंगर आठपर्यंत कधीही गेले नाही. डेपसांगमध्ये भारतीय सैन्य आपल्या पारंपरीक हद्दीत वर्ष २०१३ पासून आतापर्यंत या भागात दाखल झाले नाही. चिनी सैन्याकडून भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यास अटकाव केला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here