मुंबई: राज्यात आज नव्या बाधित रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा असून आजची रुग्णवाढ चिंताजनकच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६७ हजार १२३ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली असून हा फरक १ हजार ५०८ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४५ हजार ६५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ५६ हजार ७८३ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३८८ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 68631 new cases in a day with 45654 patients recovered and 503 deaths today)

आज राज्यात एकूण ५०३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४१९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३१ लाख ०६ हजार ८२८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९२ टक्क्यांवर आले आहे.

राज्यात ६,७०,३८८ सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३८८ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २२ हजार ४८६ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ८६ हजार ७३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८६ हजार ६८८ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७३ हजार ४८५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४२ हजार ५६३ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये १८ हजार १६३ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ३४४, जळगावमध्ये १२ हजार ७९५, तसेच नांदेडमध्ये ही संख्या १२ हजार ५७६ इतकी आहे. तर रायगडमध्ये एकूण १२ हजार १८८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ५ हजार ७६४, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ९७८ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३९ इतकी आहे.

३६,७५,५१८ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३८ लाख ५४ हजार १८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८ लाख ३९ हजार ३३८ (१६.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख ७५ हजार ५१८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २६ हजार ५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here