परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रवासी जाणाऱ्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ट्रेनची तपशीलवार माहिती देखील प्राधिकरणाला देणे गरजेचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. प्रवाशांना करोनाच्या काळात पाळावयाच्या नियमांबाबत माहिती व्हावी यासाठी रेल्वेने प्रत्येक स्थानकात अनाउंसमेंट करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक नियमांची माहिती असलेली छापील पत्रके देखील प्रवाशांना देणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. ही पत्रके मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिहिलेली असायला पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.
रेल्वेने प्रयत्न करून देखील काही प्रवासी आरटी-पीसीआर चाचणी टाळून प्रवास करण्याची शक्यताही नाकारता नाही. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने रेल्वे स्थानकांमध्ये रॅपीड अँटिजेन चाचणीची व्यवस्था करावी, अशी महत्वाची सूचनाही राज्य सरकारच्या या आदेशात करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीत इतर महत्वाच्या सूचना
> सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकार असेल
> सर्व प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना अथवा उतरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असेल
> प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणे बंधनकारक असेल
> गर्दी होऊ नये यासाठी थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांनी ट्रेनच्या वेळेआधी स्थानकात येणे अपेक्षित
> ई-तिकिटे आणि मोबाईल तिकिटांचा जास्तीत जास्त वापर करणे योग्य असेल
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times