नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ” ( ) धावणार आहे.

देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता रेल्वेने ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( LMO) आणि ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी (oxygen express) ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याची योजना रेल्वेने आखली आहे. ही एक्स्प्रेस सुरळीत धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला जात आहे. रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातून ( ) सोमवारी रिकामे टँकर विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला आणि बोकारोला रवाना केले जातील. तिथून हे टँकर आणि सिलिंडर ऑक्सिजन भरून महाराष्ट्रात येतील.

तांत्रिक चाचण्यांनंतर रिकामे टँकर्स कळंबोली, बोईसर येथे पाठवले जातील. तिथून ते रो-रो पद्धतीने विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे रवाना केले जातील. या ठिकाणी मेडिकल ऑक्सिजन भरला जाईल. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे. यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने रेल्वेद्वारे आक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती. रेल्वे क्लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्सद्वारे घेऊन जाऊ शकते, अशी विचारणा करण्यात आली होती.

कशी झाली चाचणी?

रेल्वेने तातडीने यावर कारवाई केली. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रोल ऑन रोल ऑफ सर्विसद्वारे नेता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू झाली. यासाठी टँकर्स हे रेल्वेच्या वॅगन्सवर उभे करावे लागतील. रेल्वेवरील पुलांमुळे आणि ओव्हरहेड वायर्समुळे किंवा इतर बाबींमुळे अनेक ठिकाणी उंची कमी आहे. यामुळे ३३२० मिमी उंची असलेले टँकर्स मॉडल T 1618 यासाठी उपयोगी ठरले. यानंतर अनेक रेल्वे स्थानकांवर यांची चाचणी घेतली गेली. १५ एप्रिलला मुंबईतील कळंबोली गुड्स शेडमध्ये डीबीकेएम वॅगन आणण्यात आल्या. यासोबत लिक्विड ऑक्सिजनने भरलेला एक टी 1618 टँकरही आणला गेला. उद्योग आणि रेल्वेच्या प्रतिनिधींनी उंचीचा आढावा घेतला.

कमर्शियल बुकिंग आणि फ्रेट पेमेंटसाठी रेल्वे मंत्रालयाने १६ एप्रिलला एक सर्क्युलर जारी केले आहे. १७ एप्रिलला रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योगांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. यात टँकर्सची व्यवस्था महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त करतील, असा निर्णय या बैठकीत झाला. आज रविवारी मुंबईत पश्चिम रेल्वेवर बोईसर इथे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यासाठी चाचणी घेण्यात आली. रेल्वे एका वॅगनवर लिक्विड ऑक्सिजनने भरलेला टँकर ठेवण्यात आला. त्यानंतर त्याचे माप घेण्यात आले. रेल्वेने याआधी कळंबोली आणि इतर ठिकाणीही अशा प्रकारची चाचणी घेतली. आता सोमवारी म्हणजे उद्या १० रिकामे टँकर्स रवाना करण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या परिवहन सचिवांनी १९ तारखेपर्यंत टँकर्स पुरवण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

करोना रुग्णांसाठी ३ लाख आयसोलेशन बेड तयार करण्याची रेल्वेची तयारी आहे. राज्य सरकारांनी आपल्याकडे मागणी केल्यास रेल्वे स्टेशन्सवर ही सुविधा उलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्वीट करून दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here