राम नगर येथील डॉ. नरेंद्र सरोदे यांच्या श्वास हॉस्पिटलमध्ये जिल्हा स्तरीय सुकाणु समितीने तपासणी केली. अस्थिरोग निदानाचं रुग्णालय असूनही येथे बेकायदेशीररित्या सात कोविड संशयित रुग्णांना भरती केले गेले होते. नियमांचे उल्लंघन करून या रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शनही सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी आढळून आला. त्यामुळं या रुग्णालयाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५३ नुसार दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वाचा:
कौलखेड येथील डॉ. स्वप्नील प्रकाशराव देशमुख यांच्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये ९ खाटांवर रुग्णांना भरती केलेले आढळून आले. या रुग्णालयाच्या पॅनलवर कुठलेही तज्ज्ञ डॉक्टर नसताना कोविड सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांना भरती करून रुग्णांच्या संमती पत्राविना नियमांचे उल्लंघन करत त्यांना रेमडेसिविर दिले जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ (ब) आणि कलम ५३ नुसार ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वाचा:
तसंच, महाजनी प्लॉट येथील डॉ. सागर थोटे यांच्या थोटे हॉस्पीटल व चेस्ट क्लिनिकमध्ये देखील बेकायदा कोविड केअर सेंटर सुरू करून १३ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना रेमडेसिविरचे इंजेक्शन दिले जात असल्याचेही आढळून आले. या रुग्णालयाला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत हा दंड न भरल्यास संबंधितांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times