अहमदनगर: शेवगाव येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ हंसराज बोडखे यांचा मृतदेह नेवासे तालुक्यातील येथ गोदावरी पात्रात मृतदेह आढळला. बोडखे यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

डॉ. हंसराज उर्फ अरविंद हरिभाऊ बोडखे (वय ४० रा. आखेगाव रोड, शेवगाव) हे रविवारी, ९ फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून बेपत्ता होते. बोडखे यांची इनोव्हा कार ही नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरा संगम पुलाजवळ आढळली. ही इनोव्हा कार बेवारस आढळल्याने अनेकांनी तिथे धाव घेतली. ही गाडी शेवगाव येथील अस्थिरोग तज्ज्ञ बोडखे यांची असल्याचे समजल्यानंतर शेवगाव येथील आप्तेष्ट तसेच घरातील मंडळी प्रवरा संगम येथे पोहचल्यानंतर डॉक्टर बोडखे यांची शोधाशोध सुरू झाली. रविवार तसेच सोमवारीही शोधकार्य सुरू होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर बोडखे यांचा मृतदेह गोदावरी पात्रात घटेश्वर मंदिराजवळ तरंगताना दिसला. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता बोडखे यांचा मृतदेह शेवगाव येथे नेण्यात आला. याबाबतची माहिती बोडखे यांचे चुलत बंधू मिलिंद बोडखे (रा. शास्त्री नगर, शेवगाव) यांनी नेवासे पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here