मुंबईः करोना व्हायरसचा संसर्ग देशभरात अधिकाआधिक वेगानं पसरत असल्यानं बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही करोनानं थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते यांनी केंद्र सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. तसंच, सध्याची परिस्थिती ही युद्धजन्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र पुन्हा करोनाचा लढा देत असून ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. तसंच, करोनावरील उपचारांसाठी उपयुक्त असणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडाही भासत आहे. या सगळ्या परिस्थितीवर संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

वाचाः

संजय राऊत यांनी ट्वीट करत केंद्राकडे एक मागणी केली आहे. ‘देशात अभुतपूर्व व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देशव्यापी लॉकडाऊन?

देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन वा अन्य कोणते निर्बंध लागू करायचे याचा निर्णय घेण्यास राज्ये समर्थ आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

महाराष्ट्रात करोनाचे थैमान

महाराष्ट्रात करोना संसर्गाचा कहर आणखी वाढला असून रविवारी ६८ हजार ६३१ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. कर, राज्यात काल ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही एका दिवसातील राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here