मुंबईः ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी करोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा,’ असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज एक ट्वीट करत केंद्र सरकारकडे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी केली होती. राऊतांच्या या मागणीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका करत राऊतांवर पलटवार केला आहे. तसंच, विधानसभेचे विशेष अधिवेशन त्यांना आयोजित करण्याचा सल्ला राज्य सरकारला द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.

‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी करोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना -काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा,’ असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here