वाचा:
बुलडाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘करोनावरून भाजपचे लोक जे राजकारण करताहेत त्याबद्दल मी माझी भूमिका मांडली होती. आमच्या राज्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांचे जीव वाचले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. त्या भूमिकेतून मी बोललो होतो आणि त्यावर मी ठाम आहे,’ असं गायकवाड म्हणाले. भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘नारायण राणे, नीतेश राणे यांच्यासारखे भाजपचे काही लोक मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का?,’ असा सवालही त्यांनी केला.
वाचा:
गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्या टीकेलाही गायकवाड यांनी उत्तर दिलं. ‘मी मीडियाला कधी बाइट दिला होता हे कदाचित फडणवीसांना माहीत नसेल. तेव्हा सकाळ नव्हती, संध्याकाळचे पाच वाजले होते. तळीरामांचंच म्हणाल तर ‘असे’ तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. लेडिज बारमध्ये डान्स करणारे लोक फडणवीसांचे सहकारी मंत्री होते. बुलडाण्याचे ते माजी पालकमंत्री होते,’ असंही ते म्हणाले.
वाचा:
विषाणू तोंडात कोंबण्याआधी मास्क आणि हातमोजे घाला, असा खोचक सल्ला फडणवीसांनी गायकवाड यांना दिला होता. त्याबाबत विचारलं असता गायकवाड म्हणाले, ‘आम्हाला सल्ला देण्यापेक्षा केंद्र सरकारला सल्ला द्या. राज्याला मदत द्यायला सांगा. आम्हाला फुकटचे सल्ले द्यायची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते आणि ते सल्ले उद्धवसाहेब आम्हाला देतात, आम्ही ते ऐकतो.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times