मुंबई: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशातील १८ वर्षांवरील सर्वांनाच करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा राज्याचे यांनी स्वागत केले आहे. ‘काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (cm uddhav thackeray thanked the prime minister for vaccinating everyone above 18 years of age)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत पंतप्रधानांचे आभार मानले असले, तरी लशीच्या पुरवठ्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.ॉॉ

आरोग्यमंत्र्यांनीही मानले पंतप्रधानांचे आभार

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार मानले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी आभार मानले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधीतांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here