म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या खेरडे तांडा येथिल तरुणीने टारगट तरुणांच्या छेडखानीला कंटाळून विषारी पदार्थ प्राशन करुन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ( after getting fed up with the of the youths)

मागील पंधरा दिवसांपासून घरासमोर येऊन इशारे करुन देणाऱ्या तिघा तरुणांच्या जाचाला कंटाळून १६ वर्षीय तरुणीने विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केल्याप्रकरणी या प्रकरणी गावातील तिघा संशयित तरुणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

खेरडे तांडा येथील १६ वर्षीय तरुणी घरात एकटी राहत होती. घरातील तिचे एकटेपण साधत गावातील टारगट मुलांनी नाव घेण्यास सुरवात केली. रोज तरूणीच्या घरासमोर येवून उभे रहायचे आणि इशारे करायचे. त्‍यांचा त्रास इतका वाढला की तरूणीने टोकाचे पाऊल उचलले.गावातील संशयित विशाल एकनाथ जाधव, विलास पुरनदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण हे तिघे गेल्या १५ दिवसांपासून त्रास देत होते. तिच्या घरासमोर जाऊन तिला इशारे करायचे. या प्रकारामुळे तरुणी व्यथित झाली होती. तिघा तरूणांकडून होणाऱ्या या जाचाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी मोनोसील हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

क्लिक करा आणि वाचा-
याप्रकरणी तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विशाल जाधव, विलास चव्हाण व पप्पू चव्हाण या तिघा संशयितांच्या विरोधात गोरख राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संपत आहेर करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here