तन्मयने लस घेतल्याचे एका नेटकऱ्याला मुळीच आवडले नाही. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो ‘देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का?, जर नसेल तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला?. रेमडेसिवीरप्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लशीच्या तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत असताना फडणवीस कुटुंब मात्र सुरक्षित आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
तन्मय हा कलाकार आहे आणि त्याचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असतानाही त्याने लस घेतली, असे म्हणत ही वशिलेवाजी नाही का, असा सवाल या नेटकऱ्याने विचारला आहे. तन्मय हा बॉलिवूड माफियांचाच एक भाग नाही का?… मग आता फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी तुम्ही राज्यपाल आणि पंतप्रधानांची भेट घेणार का?, असे एकावर एक प्रश्नही त्याने विचारले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्याला देवेंद्र फडणवीस व तन्मय फडणवीस यांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे केंद्र सरकारला आज १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घ्यावा लागला, असा टोलाही एका नेटकऱ्याने लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्या राज्यात सर्वसाधरण नागरिक लशीच्या एका डोससाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे राजकारण्यांच्या नातेवाईकांना लस मिळत आहे आणि तीही दुसऱ्यांदा. त्यात या नातेवाईकाचे वय ४५ वर्षांपेक्षाही कमीच आहे, अशी प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times