बुलडाणा: करोनाच्या औषधाच्या तुडवड्यावरून सुरू झालेला भाजप-शिवसेनेचा वाद शमण्याऐवजी तो वाढत जात असल्याचे दिसत आहे. आता तर हा वाद अधिकच पेटत असल्याचे दिसत आहे. या वादानंतर बुलडाण्यात दाखल झालेले भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे बुलडाण्यात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. ही दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असून त्यांना अटक झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा संजय कुटे आणि इतर भाजप नेत्यांनी बुलडाण्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतला. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (bjp mla sanjay in )

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्यानंतर यांनी संजय गायकवाड यांच्या वर सडकून टीका केली. संजय गायकवाड यांनीही पातळी सोडत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपचे संजय कुटे थेट बुलडाण्यात दाखल झाले. दरम्यान, संजय कुटे परत जात असताना त्यांच्या गाडीवर दगड फेक झाली. त्यानंतर सर्व भाजपचे नेते थेट पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहचले.

जो पर्यत या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात नाही तो इथून हलणार नाही असा पवित्रा भाजपचे आमदार संजय कुटे,आमदार श्वेता महाले,माजी आमदार चैनसुख संचेती व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून आमदारांवरच्या कारवाई बाबत वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिले. त्यानंतर सर्व भाजप नेते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या बाहेर पदाधिकारी सह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे विकृत मनोवृत्तीचे आहेत. त्यांनी अतिशय घाणेरड्या प्रकारे आमच्या नेत्यांना गलिच्छ शब्दांत शिविगाळ केली. करोनाचा विषाणू सापडला तर त्यांच्या तोंडात घालेन असे विकृत मनोवृत्तीचे आणि गलिच्छ असे बोलणे त्यांच्याकडून झाले आहे. गावातील मवाली असल्याप्रमाणे हा आमदार वागत आहे,अशी टीका डॉ. संजय कुटे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती.

क्लिक करा आणि वाचा-
आमदार संजय गायकवाड यांनी या टीकेचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी असभ्य भाषा वापरली. संजय कुटे आईच दूध प्यायले असतील तर माझ्यापासून ५० मीटरच्या आत येऊन दाखवावे, मी दाखवतो, असे आव्हान देत गायकवाड यांनी संजय कुटे यांचा असभ्य भाषेत उल्लेख केला. त्यामुळे पुन्हा वाद उफाळून आला. दरम्यान, आज दुपारी संजय कुटे इथे दाखल होऊन परत जात होते तेव्हा काही शिवसैनिकानी संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक केली.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here