करोनाविरोधी लढाईत आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाखांचे विमा कवच मिळत होते, अशी ही योजना होता. ही योजना मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याचा या मागचा हेतू होता. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाची देखभाल होईल, असा या मागचा सरकारचा प्रयत्न होता.
देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून रोज दीड लाखाहून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचा निर्णय आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र फटका बसणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात राज्यांना यासंदर्भात सर्क्युलर पाठवले आहे. ही योजना २४ मार्चला संपेल, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. या योजनेनुसार आतापर्यंत २८७ प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. या योजनेनुसार देशातील २२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले होते.
कुणासाठी होती ही योजना?
आरोग्य सुविधा केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकी सहायक, सफाई कर्मचारी आणि इतरांना हे विमा कवच देण्यात आले होते. सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉइज, नर्स, आशा वर्कर, सहायक कर्मचारी, डॉक्टर्स आणि शल्यचिकित्सक आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना हे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गेल्या वर्षी केली होती. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही यात सहभागी करून घेण्यात आलं होतं.
देशात करोनाने किती आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाने मृत्यू झाला याचा आकडा उपलब्ध नाहीए. पण देशात करोनाने आतापर्यंत ७३९ एमबीबीएस डॉक्टरांचा मृत्यू झाला, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.
ही योजना अतिशय उपयोगी ठरली. या योजनेमुळे करोनाने मृत्यू झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. ही योजना २४ मार्चपर्यंतच होती. २४ मार्चपर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत या योजनेअंतर्गत क्लेम स्वीकारले जातील. सर्व क्लेम्स सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २४ मार्चला राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times