नवी दिल्लीः दिल्लीत करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक आठवड्यांचा लॉकडाउन ( ) घोषित केला आहे. यासोबतच स्थलांतरीत मजुरांनी दिल्लीसोडून जाऊ नये, असं आवाहन करूनही काहीही उपयोग झालेला नाही. दिल्लीतून हजारो मजूर आपल्या गावी निघाले आहेत. कुणी ट्रेनने जात आहे. तर कुणी बसने. सोमवारी रात्री आनंद विहार आयएसबीटीवर ( ) गेल्या वर्षी लॉकडाउन लागल्यानंतर जे चित्र आपण बघितलं होतं. तशीच गर्दी पुन्हा दिसून आली.

दिल्लीत सरकारने राजधानीत सोमवारी रात्री १० वाजेपासून लॉकडाउन घोषित केला आहे. हा लॉकडाउन पुढच्या सोमवारी सकाळपर्यंत असणार आहे. म्हणजे एकच आठवड्याचा हा लॉकडाउन घोषित केला आहे. तरीही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडचे स्थलांतरीत मजूर गावाकडे निघाले आहेत.

लॉकडाउनमुळे आनंद विहारच्या आंतरराज्य बस स्थानकात (आयएसबीटी) आणि रेल्वे स्टेशनवर ५ हजारांहून अधिक स्थलांतरी मजूर दाखल झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ही संख्या वाढतच आहे. लॉकडाउनची घोषणा होताच शेकडोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर आनंद विहारच्या आयएसबीटी इथे पोहोचले. बस स्थानकावर तैनात पोलिसांनी मजुरांना पुन्हा परतण्याचं आवाहन केलं. पण मजुरांनी ऐकलच नाही, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. याचं कारण म्हणजे दिल्ली सरकारने आता एक आठवड्याचा लॉकडाउन घोषित केला असला तरी तो पुढे वाढवला जाऊ शकतो, अशी स्थलांतरी मजुरांना भीती आहे. यामुळे ते मोठ्या संख्येने गावी निघाले आहेत.

आम्हाला आमच्या घरी जायचं आहे. कारण लॉकडाउन वाढण्याची शक्यत आहे, असं उत्तर प्रदेशातील बरेलीचे रहिवासी असलेल्या आणि दिल्लीत दिलशाद गार्डनमध्ये कापड कारकान्यात काम करणाऱ्या मुकेश प्रताप यांनी सांगितलं.

गेल्या वर्षीही लॉकडाउनमुळे दिल्लीत काम करणारे बिहार, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमधील स्थलांतरीत मजूर बस आणि इतर वाहनं एवढचं काय तर पायी आपल्या शेकडो किलोमीटर दूर असलेल्या घराकडे निघाले होते. आनंद विहार बस स्थानकावर तर गेल्या वर्षी प्रचंड गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here